Welcome to Builders' Association of India Pune Centre Website

Press Release


Press Release

वेल बिल्ट स्ट्रक्चर उपक्रमाचे उद्घाटन
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा - बीएआय वार्षिक उपक्रम

 पुणे,15 जुलै 2019 : पुण्यातील उत्कृष्ट बांधकाम व पायाभूत सुविधा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर तर्फे घेण्यात येणाया वार्षिक वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार उपक्रमाचे उद्घाटन

वेल बिल्ट स्ट्रक्चर उपक्रमाचे उद्घाटन
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा - बीएआय वार्षिक उपक्रम

 पुणे,15 जुलै 2019 : पुण्यातील उत्कृष्ट बांधकाम व पायाभूत सुविधा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर तर्फे घेण्यात येणार्‍या वार्षिक वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार उपक्रमाचे उद्घाटन रेसिडेन्सी क्लब येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात करण्यात आले. या अंतर्गत विविध प्रकारात उत्कृष्ट बांधकाम व पायाभूत सुविधांचा शोध घेऊन अनुभवी परीक्षक मंडळातर्फे विविध निकषांवर सर्वोत्कृष्ट प्रकल्पांना 2019 च्या 20 डिसेंबर रोजी होणार्‍या कार्यक्रमात पुरस्कृत केले जाईल.या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता राजन पाटील,बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष मनोज देशमुख, उपाध्यक्ष अशोक अटकेकर,सचिव संजय आपटे, माजी अध्यक्ष प्रदीप गर्गे, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आर. बी. सूर्यवंशी, कर्नल एस.एम. अडसर, डब्ल्यूबीएससीचे समन्वयक नंदकुमार जेठानी आदी यावेळी उपस्थित होते. बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रा.लि हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.यावेळी अभियंता राजन पाटील म्हणाले की, पाश्चिमात्य देशात आणि आखाती देशात बांधकाम मजुरांच्या वसाहती (लेबर कॅम्प) या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कधीच नसतात. त्यांच्या राहण्याची वेगळी व्यवस्था केली जाते. आपल्याकडे मात्र बांधकाम सुरु असलेल्या साईटवरच त्यांची वसाहत केली जाते. दुर्दैवाने काही घटना घडल्यास अशा घटनांमध्ये निष्पाप बळी जातात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) यासाठी प्रयत्न करावेत.

 मनोज देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. बांधकामातील दर्जा आणखी कसा सुधारता येईल आणि त्यासाठी कौशल्ये विकसित करण्यासाठी बीएआय काम करते असे सांगून बांधकाम व्यवसायात एक आचार संहिता असावी यासाठी बीएआय प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदीप गर्गे म्हणाले, मोठ्या शहरांमध्ये बांधकाम व्यावसायिकांना जशा सुविधा उपलब्ध असतात तशा सुविधा ग्रामीण भागात अथवा छोट्या शहरांमध्ये मिळत नाही. तरीही अनेक बांधकाम व्यावसायिक बांधकामाचा दर्जा टिकवून ठेवतात. त्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्याचा मानस असून त्यासाठी बीएआयच्या कार्यक्षेत्राची कक्षा रुंदावणार आहोत.

 ज्युरींच्या वतीने सतीश भुजबळ यांनी तर नंदकुमार जेठानी, रत्नरूप प्रोजेक्ट्स प्रा. ली.चे जगन्नाथ जाधव, भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे जयदीप राजे,आर. बी. सूर्यवंशी, कर्नल एस.एम. अडसर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मिरानी यांनी केले तर आभार संजय आपटे यांनी मानले.

Well Built Structure Award Ceremony
Held In Pune

  Pune 14 December 2018 :The Well Built Structure Competition ( WSBC) awards ceremony organised by Builders Association of India ( BAI ) Pune was held at Sheraton Grand on Friday.

Well Built Structure Award Ceremony Held In Pune

  Pune 14 December 2018 :The Well Built Structure Competition ( WSBC) awards ceremony organised by Builders Association of India ( BAI ) Pune was held at Sheraton Grand on Friday . Chief Guest and BAI National President A. Puhazhendi , Guest of Honour and Vice President BAI West Zone Pratap Salunkhe ,Pradeep Garge Chairman BAI Pune Center , Jagannath Jadhav Chairman WBSC , Convenor Nandkumar Jethani, Past Chairman Siddharth Shah , Senior Chief Executive B.G Shirke Construction Pvt Ltd R.B Suryavanshi , Mahesh Mirani ,Ranjeet More amongst others were present on the occasion . BG Shirke Construction Pvt Ltd have been the sole sponsors of the event . V.G Jana Senior Chief Executive B.G Shirke Construction Pvt Ltd was conferred the Life Time Achievement Nirman Ratna Award for his contribution to this field . A BAI diary was also released on the ocassion

  Pune 14 December 2018 :The Well Built Structure Competition ( WSBC) awards ceremony organised by Builders Association of India ( BAI ) Pune was held at Sheraton Grand on Friday . Chief Guest and BAI National President A. Puhazhendi , Guest of Honour and Vice President BAI West Zone Pratap Salunkhe ,Pradeep Garge Chairman BAI Pune Center , Jagannath Jadhav Chairman WBSC , Convenor Nandkumar Jethani, Past Chairman Siddharth Shah , Senior Chief Executive B.G Shirke Construction Pvt Ltd R.B Suryavanshi , Mahesh Mirani ,Ranjeet More amongst others were present on the occasion . BG Shirke Construction Pvt Ltd have been the sole sponsors of the event . V.G Jana Senior Chief Executive B.G Shirke Construction Pvt Ltd was conferred the Life Time Achievement Nirman Ratna Award for his contribution to this field . A BAI diary was also released on the ocassion

  The award winners for WSBC 2018 included Vaichal Construction Pvt Ltd ( Residential Category - Bungalow , Row Houses and standalone buildings ) , Pride Builders LLP ( Residential - Housing Complex ) , Kamakshie Construction ( Commercial) , RMK Infrastructure pvt ltd ( Industrial) , RMK Infrastructure pvt ltd ( Infrastructure)., S.J Contracts pvt ltd ( Well Equipped Well Mechanised) , V.M Matere Infrastructures pvt ltd ( Government) and Millennium Engineers and Contractors Pvt Ltd ( Work upto cold shell).

 Chief Guest and BAI National President A. Puhazhendi , Guest of Honour and Vice President BAI West Zone hailed the work done by BAI Pune Center . Pradeep Garge,Chairman BAI Pune.Center gave the introductory speech , while Jagannath Jadhav, Chairman WBSC gave details about the competition . Dhananjay Hirwe , Chairman Jury panel gave a report on the procedure used for evaluating the entries .BAI Pune.Center Hon. Secretary Ashok Atkekar gave the vote of thanks.

बीएआय तर्फे वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार सोहळा
व्ही.जी.जाना यांना जीवनगौरव पुरस्कार

 पुणे, 15 डिसेंबर 2018 : बांधकाम क्षेत्रात होणार्या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या हेतूने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर तर्फे वार्षिक वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार सोहळा नुकताच पुण्यात संपन्न झाला.

बीएआय तर्फे वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार सोहळा
व्ही.जी.जाना यांना जीवनगौरव पुरस्कार

 पुणे, 15 डिसेंबर 2018 : बांधकाम क्षेत्रात होणार्या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या हेतूने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर तर्फे वार्षिक वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार सोहळा नुकताच पुण्यात संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे व बीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ए.पुहाजेंडी,सन्माननीय अतिथी व बीएआय पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष प्रताप साळुंके,बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष प्रदीप गर्गे,माजी अध्यक्ष व वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन (बीएससी) 2018 चे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रा.लि.चे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आर.बी.सुर्यवंशी, डब्ल्यूबीएससीचे समन्वयन नंदकुमार जेठानी, बीएआय पुणे सेंटरचे मानद सचिव अशोक अटकेकर,सूत्रसंचालक महेश मिरानी आदी उपस्थित होते.याप्रसंगी बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रा.लि.चे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी व्ही.जी.जाना यांना बीएआय-शिर्के निर्माण रत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमात बीएआय डायरीचे अनावरण करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रा.लि हे मुख्य प्रायोजक आहेत.

 डब्ल्यूबीएससी 2018 पुरस्कार विजेत्यांमध्ये वायचळ कन्स्ट्रक्शन प्रा.लि.(रेसिडेंशियल-बंगलो,रॉ हाऊसेस,स्टँड अलोन बिल्डिंग्स),प्राईड बिल्डर्स एलएलपी (रेसिडेंशियल- हाउसिंग कॉम्प्लेक्स),कामाक्षी कन्स्ट्रक्शन्स (कमर्शियल),आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.(इंडस्ट्रीयल), आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.(इन्फ्रास्ट्रक्चर),एसजे कॉन्ट्रॅक्टस प्रा.लि. (वेल इक्विप्ड,वेल मेकनाईज्ड),व्ही.एम.मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. (गव्हर्नमेंट),मिलेनियम इंजिनिअर्स अॅन्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा.लि.(वर्क अप टू कोल्ड शेल -आरसीसी,मॅसोनरी अॅन्ड प्लास्टर वर्क्स) यांचा समावेश आहे.

 प्रमुख पाहुणे व बीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ए.पुहाजेंडी व सन्माननीय अतिथी व बीएआय पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष प्रताप साळुंके यांनी बीएआय पुणे सेंटरच्या कार्याचे कौतुक केले.बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष प्रदीप गर्गे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.जगन्नाथ जाधव यांनी या पुरस्कारांबाबत माहिती दिली.परीक्षक मंडळाचे अध्यक्ष धनंजय हिरवे यांनी निवडप्रक्रियेबाबत सांगितले तर अशोक अटकेकर यांनी आभार प्रदर्शन केले.